अनंत पिळणकर यांचा गोव्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भास्कर भूषण पुरस्काराने होणार सन्मान

कणकवली ता.२५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गेली तीन दशके विविध पदांवर कार्यरत असलेले आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अल्पावधीत जिल्ह्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे अनंत पिळणकर यांना भास्कर भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन कडून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराने अनंत पिळणकर यांना शनिवारी गोवा येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

व्यवसायाने शेतकरी असलेल्या अनंत पिळणकर यांची संपूर्ण जिल्ह्याला सर्वात आधी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. सिंधुदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर स्वतःच्या गावच्या विकासासाठी आणि गावातील पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी नवीन कुर्ली विकास समिती ता. कणकवली जि. सिंधुदूर्गचे अध्यक्ष म्हणून ते नेहमीच अग्रस्थानी राहिले आहेत.

अखिल भारतीय हयूमन राईटस् संघटना सिंधूदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणूनही ते काम पाहतात. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यात हिरीरीने सहभाग. कोकण विभागातील सर्वसामांन्य नागरीकापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे यशस्वीपने राबवून कोकणवासीयांसाठी अवीरत सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार राहिलेला आहे. नवीन कुर्ली विकास समिती व अखिल भारतीय हयूमन राईटस् संघटनेच्या मार्फत त्यांनी नेहमीच जसेवेला प्राधान्य दिले आहे.

शनिवार 28 मे मी रोजी गोवा पर्वरी येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. यावेळी यावेळी गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, केंद्रीय पर्यटन जल परिवहन बंद विकास राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप, गोवा राज्य पत्रकार युनियन ग्रुप अध्यक्ष किशोर गावकर, गोव्यातील कामगार नेते अजितसिंह राणे सरदेसाई, रवींद्र भवन साखळी गोवा उपाध्यक्ष विठोबा घाडी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

You cannot copy content of this page