युवापिढीला व्यवसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रबोधनाची गरज

*⚡वेंगुर्ला ता.२४-:* समाजपरिवर्तनामध्ये युवापिढीचा सहभाग आवश्यक आहे. तरच विकासाचे स्वप्न साकार होऊ शकते. परंतु, आज युवापिढी काही प्रमाणात व्यसनाच्या दिशेने जाताना दिसत आहे, ते थांबविण्याकरीता युवापिढीमध्ये याविषयी प्रबोधन होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सिधुदुर्ग जिल्हा युथ संस्थेचे जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीनिवास गावडे यांनी केले.

युवापिढी अंमली पदार्थ सेवन करीत असल्याचे वृत्त समोर येत आहे, अशावेळी पालकांनी जागृत राहण्याची गरज आहे. भविष्यात या सापळ्यात अडकणा-या युवापिढीला वेळीच रोखले पाहिले. भविष्यात युवापिढी सुदृढ व निरोगी होण्याकरीता व्यसनमुक्त विषयी प्रबोधन होणे आवश्यक असल्याचे डॉ.गावडे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page