*⚡वेंगुर्ला ता.२५-:* सिधुदुर्ग जिल्ह्यासह वेंगुर्ला तालुक्यातही अंमली पदार्थांची तस्करी, वाहतुक आणि सेवन यात वाढ झालेली आहे. याकडे विशेष लक्ष घालून उपाययोजना केली नाही तर युवा पिढी भविष्यात बरबाद होऊ शकते. तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून वाचविण्यासाठी अंमली पदार्थांच्या विरोधात सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे. हा लढा सशक्त करण्यासाठी याला पाठबळाची गरज आहे, यासाठी २७ मे रोजी सायंकाळी ४ वाजता वेंगुर्ला साई मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे.
यावेळी बहुसंख्य पालकांनी, स्वयंसेव संस्थांनी तसेच सामजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन ‘आम्ही वेंगुर्लेकर‘ यांच्यातर्फे निमंत्रक अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांनी केले आहे.
