पोलीस घटनास्थळी दाखल
वेंगुर्ले ता.२५-:* तालुक्यातील शिरोडा समुद्रात काल मंगळवारी बुडालेल्या वेत्ये येथील सुनिल देवू गावकर ( ४५) या तरुणाचा मृतदेह आज बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास शिरोडा समुद्र किनारी आढळून आला. याबाबत ग्रामपंचायत सदस्य आजू अमरे यांनी शिरोडा पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.
त्यामुळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. शिरोडा समुद्रात आपल्या गावातील सहकाऱ्यांसोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये येथील तरुण सुनील गावकर हा काल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास समुद्रात आंघोळी साठी उतरला असताना मोठ्या लाटा मध्ये कुठे दिसेनासा झाला आणि बुडाला.
त्याठिकाणी असलेल्या इतर पर्यटक व मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. दरम्यान पोलसांना या दुर्घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती. मात्र समुद्राला उधाण असल्याने समुद्रात जाऊन त्यांला शोधता आले नव्हते. दरम्यान आज सकाळी गावकऱ याचा मृतदेह समुद्राच्या पाण्यात दिसताच समीर भगत, उदय भगत, संतोष भगत, सुरज अमरे, आजू अमरे यांनी तो बाहेर काढून किनाऱ्यावर आणून ठेवला.
आणि याची माहिती पोलिसांना दिली आहे. *राज स्पोर्ट्स सुरू असता तर गावकर याचे वाचले असते प्राण* शिरोडा समुद्रकिनार्यावर राज स्पोर्ट्स सध्या बंद आहे. जर हे राज स्पोर्ट्स चालू असते तर गावकर याचा प्राण वाचला असता असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. या राज स्पोर्ट मुळे आतापर्यंत २५ ते ३० पेक्षा जास्त लोकांचे प्राण बुडताना स्पोर्ट च्या कर्मचाऱ्यांनी जेस्की च्या सहाय्याने वाचवले आहेत. काल सायंकाळी गावकर याची दुर्घटना घडल्यानंतर प्रकर्षाने राज स्पोर्ट च्या कर्मचाऱ्यांची स्थानिकांना आठवण झाली.
