मोहिनी मडगावकर यांना भास्कर भूषण पुरस्कार जाहीर…

गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुरस्काराने होणार सन्मान…

सावंतवाडी ता.२५-:* सिंधुदुर्गाच्या समाजकारण व पक्ष वाढीसाठी सातत्याने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण करून नेहमी समाजासाठी काम करणाऱ्या भाजपच्या महिला शहराध्यक्ष सौ मोहिनी मडगावकर यांना भास्कर भूषण पुरस्कार प्राप्त झाला असून येत्या शनिवारी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

यावेळी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, केंद्रीय पर्यटन जल परिवहन बंदर विकास राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी केंद्रीय कायदा मंत्री अँड. रमाकांत खलप, गोवा राज्य पत्रकार यूनियन ग्रुप अध्यक्ष किशोर गावकर, कामगार नेते गोवा अजितसिंह राणे सरदेसाई, उपाध्यक्ष रवींद्र भवन साखळी गोवा विठोबा घाडी,आदी उपस्थित असणार आहेत.

You cannot copy content of this page