नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रस्त्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांचे उपोषण स्थगित

कणकवलीत प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले लेखी आश्वासन

कणकवली ता.२५-:* नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रस्त्यासाठी सर्वपक्षीय ग्रामस्थांनी साखळी उपोषण प्रांतकार्यालयासमोर छेडले.त्यावर प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी सर्व्हिस रस्ता खुला करण्यासाठी गतीने काम सुरु आहे.नलावडे कुटूंबियांना लेखी पत्र आजच देत आहोत,की वाढीस जमीन नोटीस बजावली आहे, आता बांधकाम मोबदल्याबद्दल निवाडा तयार करुन महामार्ग प्राधिकरणला पाठवला असून मंजुरी मिळताच दुसऱ्या दिवशी नोटीस बजावली जाईल, असे सांगत मागणी बद्दल लेखी आश्वासन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांना दिल्यावर साखळी उपोषण स्थगित करण्यात आले आहे.तसेच महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अभियंता श्री.शिवनिवार व कुमावत हे दुपारी २.३० वाजता सर्व्हिस रस्ता चालू करण्याबाबत प्रत्यक्ष पाहणी ग्रामस्थांना घेऊन करणार आहेत. नांदगाव ग्रामस्थांनी कणकवली प्रांतकार्यालयासमोर सर्व्हिस रस्ता खुला करण्यासाठी नांदगांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी साखळी उपोषण केले.यावेळी झालाच पाहिजे,झालाच पाहिजे.. सर्व्हिस रस्ता झालाच पाहिजे..,कोण म्हणतंय देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही,अशा घोषणा ग्रामस्थांनी दिल्या.सकाळी १० वाजल्यापासून हे उपोषण सुरु करण्यात आले.

या उपोषणाला कॉग्रेसचे प्रदीप मांजरेकर, सरचिटणीस प्रवीण वरुनकर,भाजप तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री,भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे,मनसे तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी व सर्व्हिस रस्त्याचा ज्वलंत प्रश्न असल्याने पत्रकारांनी या साखळी उपोषणाला पाठींबा दर्शवला . दरम्यान, कणकवली प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करत उपोषण मागे घ्यावे, असे सांगितले. त्यावर उपोषणकर्त्यांनी लेखी आश्वासन द्या अशी मागणी केली. अखेर प्रांताधिकार्‍यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन सर्विस रस्त्याबाबत दिल्यामुळे हे उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भाई मोरजकर यांनी दिली.

या साखळी उपोषणात पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके,सामजिक कार्यकर्ते भाई मोरजकर,असलदे सरपंच पंढरी वायगंणकर,ओटव उपसरपंच राजेश तांबे,विश्वनाथ जाधव,मारुती मोर्ये,नितेश म्हसकर,आशिये माजी सरपंच शंकर गुरव,नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर,जेष्ठ पत्रकार संतोष वायगंणकर, पत्रकार भगवान लोके, माजी सरपंच संजय पाटील,हनुमंत वाळके,कमलेश पाटील,संतोष पुजारे,आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.

You cannot copy content of this page