निकृष्ट काम लपविण्यासाठी रस्त्यावर टाकली खडीची पावडर;उप तालुकाध्यक्ष सुधीर राऊळ यांचा आरोप:मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा दिला इशारा
सावंतवाडी ता.२५-:* माजगाव ते मळगाव बाजारपेठ पर्यंतच्या रस्त्याचे काम पुन्हा का करण्यात आले असा सवाल मनसे उप तालुकाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी करण्यात आलेले या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होते, ते काम लपविण्यासाठी रस्त्यावर खडीची बारीक पूड टाकून तो निकृष्ट रस्ता लपविला जात आहे.
तसेच ही पूड वाऱ्याने उडून दुचाकी स्वारांच्या डोळ्यात जात असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे काम मळगाव शाखा अध्यक्ष राकेश परब, प्रथमेश राणे यांनी बंद पाडले आहे. या गलथान कारभाराचा नागरिकांना आणि प्रवाश्यांना त्रास होत असून, अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित केला आहे. यावर योग्य ती कार्यवाही न केल्यास मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा सुधीर राऊळ यांनी दिला आहे
