Headlines

तिलारी प्रकल्पात 83.62 टक्के पाणीसाठा

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१०-: तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 514.327 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 374.105 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 83.62 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 82.50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Read More

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 94.00 मि.मी. पाऊस

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१०-: गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 94.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 43.7 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1525.2 मि.मी. पाऊस झाला आहे.

Read More

गरजू महिलांना प्रत्येकी दहा हजारांची मदत

सामंत ट्रस्टची सामाजिक बांधिलकी ⚡सावंतवाडी ता.१०-: येथील कै.डॉ.भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम येथे दोन गरजू निराधार महिलांना सामंत ट्रस्ट मुंबई तर्फे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. कोलगांव येथील लक्ष्मी दळवी या ७० वर्षांच्या दारिद्रय रेषेखालील निराधार आणि मधुमेह, उच्च रक्तदाब आजार असलेल्या आजीला आणि माणगाव येथील माधवी कुंभार या दारिद्रय रेषेखालील निराधार मातेला…

Read More

संस्थान कालीन विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी साजरी

व्यापारी प्रसाद मुंज यांना मिळाला पूजेचा मान ⚡सावंतवाडी,ता.१०-: येथील संस्थानकालीन विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यनिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. यावर्षी पूजेचा मान व्यापारी प्रसाद मुंज यांना देण्यात आला. शहरासह परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या उत्साहाने श्रीचे दर्शन घेतले. दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची वर्दळ सुरु झाली होती. विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

Read More

स्विफ्ट कारचा मोती तलावकाठी अपघात…

⚡सावंतवाडी ता.१०-: कारवरील ताबा सुटून स्विफ्ट कार थेट मोती तलावाच्या कठड्यावर चढत लोटस लॅम्प च्या पोलाला धडकली.हा अपघात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला. यात कारचे मोठे नुकसान झाले असून घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Read More

सावंतवाडी येथील क्राऊन बेकरीचे मालक स्टीफन डिसोजा यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.०९-: मच्छी मार्केट येथील क्राऊन बेकरीचे मालक स्टीफन साल्वादोर डिसोजा (72) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवसापासून ते आजारी होते. गोवा येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उद्या रविवारी सायंकाळी चार वाजता अंत्यविधी होणार आहे.

Read More

रोटरी फिजिओथेअरपी सेंटर संस्थां गरजु रुग्णांसाठी माफक दरात सेवा देणारी संस्था

कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी, गुढगेदुखी, पॕरेलेसीस रुग्ण, शस्त्रक्रियेनंतरचे व्यायाम आदीवर सुविधा उपलब्ध ⚡सावंतवाडी ता.०९-: रोटरी फिजिओथेअरपी सेंटर ही संस्थां गरीब आणि गरजु रुग्णांसाठी माफक दरात सेवा देणारी संस्था सावंतवाडीत कार्यरत असुन आजवर अनेक रुग्ण बरे होऊन आपल्याला दैनंदिन आयुष्याला सुरवात करते झाले आहेत. रोटरी फिजिओथेअरपी सेंटर मध्ये कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी, गुढगेदुखी, पॕरेलेसीस रुग्ण, शस्त्रक्रिये नंतरचे व्यायाम…

Read More

आरोस गिरोबा मंदिरात उद्या हरिनाम सप्ताह

⚡बांदा ता ०९-: आरोस श्री देव गिरोबा मंदिर येथे दि. 10 जुलै रोजी हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यास हातभार लावत देव दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समिती आरोस तर्फे करण्यात आले आहे.

Read More

चार बुलेट स्वारांवर मालवण पोलिसांची कारवाई

कर्णकर्कश आवाजासह बुलेट चालवणे व अन्य नियमांचे उल्लंघन प्रकरणी कारवाई ⚡मालवण ता.०९-:बुलेटच्या सायलेन्सर सिस्टीममध्ये बदल करून मोठ्या कर्णकर्कश आवाजासह बुलेट चालवणे, तसेच नियमांचे उल्लंघन प्रकरणी चार बुलेट स्वारांवर मालवण पोलिसांनी कारवाई केली आहे. नियमांनुसार वाहन न चालवणाऱ्यांवर कारवाई सुरूच रहाणार असल्याचे मालवण पोलिसानी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून मालवण शहर परिसरात कर्णकर्कश आवाजासह रात्री उशीराही…

Read More

मालवण देऊळवाडा- कुंभारमाठ रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

⚡मालवण ता.०९-: मालवण कसाल राज्यमार्गावरील मालवण देऊळवाडा ते आणि कुंभारमाठ ग्रामपंचायतीच्या सीमेपर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे हा रस्ता वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. देऊळवाडा ते कुंभारमाठ हा रास्ता जरीमरी घाटीतून जात असल्याने हा रस्ता चढाव व उताराचा तसेच धोकादायक वळणांचा आहे. देऊळवाडा…

Read More
You cannot copy content of this page