रोटरी फिजिओथेअरपी सेंटर संस्थां गरजु रुग्णांसाठी माफक दरात सेवा देणारी संस्था

कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी, गुढगेदुखी, पॕरेलेसीस रुग्ण, शस्त्रक्रियेनंतरचे व्यायाम आदीवर सुविधा उपलब्ध

⚡सावंतवाडी ता.०९-: रोटरी फिजिओथेअरपी सेंटर ही संस्थां गरीब आणि गरजु रुग्णांसाठी माफक दरात सेवा देणारी संस्था सावंतवाडीत कार्यरत असुन आजवर अनेक रुग्ण बरे होऊन आपल्याला दैनंदिन आयुष्याला सुरवात करते झाले आहेत.


रोटरी फिजिओथेअरपी सेंटर मध्ये कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी, गुढगेदुखी, पॕरेलेसीस रुग्ण, शस्त्रक्रिये नंतरचे व्यायाम इत्यादीवर सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णावर इलेक्ट्रिक थिअरपीने उपचार केले जातात.
यासाठी रोटरी फिजिओथेअरपी सेंटर, साधले मेस समोर, खासकीलवाडा येथे मंगळवार दि.12 जुलै रोजी सायं.4 ते 8 वाजेपर्यंत “मोफत कँम्प” चे आयोजन केले आहे. तरी या सेवेचा फायदा घेऊन आपल्या व्याधीची परीक्षा करुन घ्यावी ही विनंंती.
टीप : दर शनिवारी यापुढे “मोफत फिजिओथेअरपी कँम्प” सायं.4 ते 8 यावेळेत घेण्यात येईल याची नोंद घ्यावी.

You cannot copy content of this page