बांद्यात संत सोहिरा मठात श्रीगुरुपौर्णिमा उत्साहात
बांदा दि.14 (प्रतिनिधी)- बांदा येथिल संत सोहिरोबानाथ आंबिये मठात श्री गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.यानिमित्त मठात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.सकाळी नाथवंशज प्रसाद आंबिये यांनी नाथांच्या पादुकांचे पुजन केले.तसेच उदय परांजपे यांच्या पौरोहित्याखाली अभिषेक करण्यात आला. त्यानंतर संत सोहिरोबानाथ चरित्रामृताचे वाचन करण्यात आले. सायंकाळी 4 वाजता भाविकांच्या…
