माजी नगरसेवक आनंद नेवगी यांचा पाठपुरावा
⚡सावंतवाडी ता.१४-: मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे काही दिवसांपूर्वी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडई येथील कोसळलेल्या त्या छपराचे काम नगरपालिकेने पूर्ण केले आहे. याबाबत माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी लक्ष वेधले होते.
याबाबत अधिक वृत्त अस की गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे हे छप्पर कोसळले होते. त्यामुळे त्या ठिकाणी बसणाऱ्या विक्रेत्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. हीबाब लक्ष घेता याबाबत नेवगी यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचे लक्ष वेधले होते. त्यांनी तात्काळ दखल घेऊन हे छपराचे काम तात्काळ पूर्ण केले आहे. त्यावर श्री. नेवगी यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले.
