सावंतवाडी येथे रथसप्तमीनिमित्त १०८ सूर्यनमस्कार संकल्प योगशिबीर उत्साहात संपन्न…
⚡सावंतवाडी ता.२५-: रथसप्तमी अर्थात जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्ग व घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे आज (दि. २५ जानेवारी २०२६) १०८ सूर्यनमस्कार संकल्प योगशिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. मन, शरीर आणि आत्मा यांचा संगम म्हणजे योग हा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात…
