Headlines

व्यवस्थापन सोसायटी व न्हावेली ग्रामस्थांची एकत्रित सुनावणी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात संपन्न

⚡सावंतवाडी ता.१२-: न्हावेली येथील रास्त धान्य दुकानातून ग्राहकांना वेळेवर धान्य द्या, अन्यथा कारवाई करावी लागेल अशा सुचना नायब तहसीलदार मुसळे यांनी सोसायटी चेअरमन धाऊसकर यांना केल्या आहेत. न्हावेली येथील रास्त धान्य दुकान हे नियमित चालू नसते. तसेच योग्यवेळी धान्य पुरवठा केला जात नाही. त्याच प्रमाणे त्या ठिकाणचे कर्मचारी हे ग्राहकांची उर्मटपणे वागतात अशी लेखी तक्रार…

Read More

नॅशनल युथ आयकॉन अवॉर्ड युवा उद्योजक विशाल परब यांना प्रदान…

⚡कुडाळ ता.१२- : जागतिक युवा संघटना राष्ट्रीय युवा पुरस्कार फेडरेशन ऑफ इंडिया, राष्ट्रीय युवा आणि आयजी पुरस्कार, युवा संसद, युवा महोत्सव आणि राष्ट्रीय पुरस्कार युवा उद्योजक आणि भाजपचे युवा नेते विशाल परब यांना दिल्ली न्यू महाराष्ट्र सदन येथे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मा मानाचा “नॅशनल युथ आयकाॅन अवॉर्ड” युवा उद्योजक विशाल…

Read More

गणेश चतुर्थीपुर्वी वीज पुरवठा सुरळीत करा

अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही;काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.१२-: तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात गेले कित्येक दिवस सुरु असलेला विजेचा लपंडाव याला महावितरणाचे अधिकारी जबाबदार असून गणेश चतुर्थी पुर्वी वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशारा काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिला आहे. तर कायद्याचा धाक दाखवून…

Read More

स. का. पाटील महाविद्यालयात नारळ लढविणे स्पर्धा संपन्न

⚡मालवण ता.१२-: स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त कॉलेजमधील युवक युवतींची नारळ लढविणे स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन कॉलेजच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत व प्रा. अन्वेशा कदम यांनी नारळ लढवून केली. या स्पर्धेमध्ये तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या अमित बोर्डवेकर याने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक प्रथम वर्ष कला शाखेच्या तुषार घाडीगावकर याने पटकावला….

Read More

शिरोडा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा

⚡वेंगुर्ले ता.१२-: देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत शिरोडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचा सिंहाचा वाटा आहे.. शिरोडा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित कार्यक्रमात या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. सर्वांच्या मनात देशभक्ती निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक नागरिकांनी १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत आपल्या घरी झेंडा फडकवावा व ध्वज संविधानाचे नियम पाळावे. शिरोड्यात महात्मा गांधी स्मारकासाठी १२ वर्षापासून प्रयत्न…

Read More

गणेशोत्सवानिमित्त चिपी विमानतळावर 18 ऑगस्ट पासून अजून एक विमान फेरी सुरू

आमदार नितेश राणे यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.१२-: गणेश चतुर्थीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना एक सुवर्णसंधी देण्यात आली असून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर 18 ऑगस्टपासून खास गणेशोत्सवासाठी आणखी एक विमान सुरु करण्यास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मान्यता दिली असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आम.नितेश राणे बोलत होते.आमा.नितेश राणे…

Read More

सोनू सावंत कुटुंबियांचे शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी केले सांत्वन

⚡कणकवली ता.१२-: वरवडे येथील रहिवासी कणकवली भाजपचे उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांचे बंधू मनोज सावंत यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी जाऊन शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.यावेळी युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, कणकवली युवासेना सरचिटणीस धनंजय सावंत, वरवडे शाखाप्रमुख फ्रँकी लोबो, सुधिर सावंत आदी उपस्थित होते.

Read More

लाडाची बाग येथे बंद घरात सापडला महिलेचा मृतदेह

पोलीस घटनास्थळी दाखल ⚡सावंतवाडी ता.१२-: येथील लाडाची बाग येथे एका बंद घरात महिलेचा मृतदेह सापडला असून, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Read More

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून दि. 12 ऑगस्ट ते 14 ऑस्ट रोजी राज्याच्या किनारपट्टीवर ताशी 45 ते 60 कि.मी. प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच दि. 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीत समुद्र खबळलेला राहणार असल्याने या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी…

Read More

मळगाव घाटीतील धोकादायक झाडे तात्काळ तोडा, अन्यथा आंदोलन : गुणाजी गावडे

⚡सावंतवाडी ता.१२-: सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनविभाग यांच्यात एकमत नसल्यामुळे मळगाव घाटीतील धोकादायक झाडांचा प्रश्न जैसे थे आहे, काल झालेला प्रकार लक्षात घेता धोकादायक झाडे तोडा अन्यथा दुदैवाने एखादा अपघात घडल्यास त्यांला दोन्ही विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील , असा इशारा वेत्ये उपसरपंच तथा युवा सेनेचे पदाधिकारी गुणाजी गावडे यांनी दिला आहे. काल रात्री झालेल्या वादळी…

Read More
You cannot copy content of this page