⚡मालवण ता.१२-: स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त कॉलेजमधील युवक युवतींची नारळ लढविणे स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन कॉलेजच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत व प्रा. अन्वेशा कदम यांनी नारळ लढवून केली. या स्पर्धेमध्ये तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या अमित बोर्डवेकर याने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक प्रथम वर्ष कला शाखेच्या तुषार घाडीगावकर याने पटकावला. तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक तृतीय वर्ष बीएस्सी शाखेच्या मॅक्सिना फर्नांडिस हिने पटकाविला.
या स्पर्धेमध्ये मुलांमध्ये एकूण ३० स्पर्धक सहभागी झाले होते. तर ज्युनिअर कॉलेज मधून १० स्पर्धक सहभागी झाले होते यामध्ये बारावी वाणिज्य शाखेच्या सौरभ साळकर याने प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी प्राचार्या डॉ. उज्वला सामंत, प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा. एम. आर. खोत, प्रा. हसन खान, प्रा. कैलास राबते, प्रा. एच. एम. चौगले व इतर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून प्रा. संकेत बेळेकर, प्रा. डी. व्ही. हारगिले यांनी केले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित सर्व प्राध्यापक वर्गाने नारळ लढविण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
