आमदार नितेश राणे यांनी दिली माहिती
⚡कणकवली ता.१२-: गणेश चतुर्थीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना एक सुवर्णसंधी देण्यात आली असून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर 18 ऑगस्टपासून खास गणेशोत्सवासाठी आणखी एक विमान सुरु करण्यास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मान्यता दिली असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आम.नितेश राणे बोलत होते.
आमा.नितेश राणे म्हणाले,18 ऑगस्ट पासून सायंकाळी 3 वाजता मुंबई हुन हे विमान सुटून 4.20 वा. ते विमान सिंधुदुर्ग चिपि विमानतळावर लँडिंग होणार आहे. तर पुन्हा 4.45 ला टेक ऑफ घेत 6.20 वा. मुंबईला लँडिंग होणार आहे. गणेश चतुर्थीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना ही एक सुवर्णसंधी देण्यात आली असून, चाकरमान्यांनी देखील या संधीचा लाभ घ्यावा आम.नितेश राणे यांनी केले आहे. तूर्तास गणेशोत्सवासाठी ही नवीन विमान फेरी सुरू केली आहे. परंतु येत्या काळात ही विमान सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले.
