नॅशनल युथ आयकॉन अवॉर्ड युवा उद्योजक विशाल परब यांना प्रदान…

⚡कुडाळ ता.१२- : जागतिक युवा संघटना राष्ट्रीय युवा पुरस्कार फेडरेशन ऑफ इंडिया, राष्ट्रीय युवा आणि आयजी पुरस्कार, युवा संसद, युवा महोत्सव आणि राष्ट्रीय पुरस्कार युवा उद्योजक आणि भाजपचे युवा नेते विशाल परब यांना दिल्ली न्यू महाराष्ट्र सदन येथे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मा मानाचा “नॅशनल युथ आयकाॅन अवॉर्ड” युवा उद्योजक विशाल परब यांना आज दिल्लीत प्रदान करण्यात आला.

यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर,केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, मिझोराम चे माजी राज्यपाल अमुलक रतन कोहली आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विशाल परब यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या आजपर्यंतच्या कारकीर्दीत एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.विशाल परब हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा उद्योजक म्हणून परिचीत आहेत.पण उद्योक क्षेत्रात मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मान उंचावली आहे.त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page