सोन्याचे दागिने खरेदी करून दुकानदाराची फसवणूक करणारा आरोपी वेंगुर्ला पोलिसांच्या ताब्यात
वेंगुर्ला:वेंगुर्ला येथील एका सोन्याच्या दुकानातून ३ लाख ८८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी करून फक्त १० हजार रुपये देऊन फसवणूक करणाऱ्या सांगली येथील रणधीर भोसले याला वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दिनांक ३ ऑगस्ट २०२२ रोजी वेंगुर्ला कलानगर रामेश्वर कॉम्प्लेक्स मधील श्री स्वामी समर्थ ज्वेलर्सचे मालक प्रशांत सदाशिव मालवणकर यांच्या सोन्याच्या दुकानातून आरोपी रणधीर राजेंद्र भोसले…
