⚡कणकवली ता.१३-: कणकवली येथील मिळून साऱ्याजणी महिला मंचातर्फे मंगळवार 16 ऑगस्ट रोजी, शिवशक्ती हॉल कनक नगर येथे सायंकाळी 3 ते 6 या वेळेत सर्व महिलांसाठी श्रावण सरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी श्रावण महिन्यातील व्रतवैल्यानंमागील धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन , हळदी कुंकू, आणि फुगड्यां असे कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. गेली अनेक वर्षे मिळून साऱ्याजणी महिला मंच, या कार्यक्रमाचे आयोजन करत आलेला आहे आणि यासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आलेला आहे. याहीवर्षी जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवत फुगड्यांचा आनंद लुटावा अशी विनंती मिळून साऱ्याजनी महीला मंचतर्फे करण्यात येत आहे.
