निमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
⚡सावंतवाडी ता.१३-: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने शहरात भव्य रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूल मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या रॅलीत विद्यार्थ्यांनी भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, भगतसिंग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी वंदे मातरम्…!, भारत माता की जय…! अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
