स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तळवडे नं. ९ प्रशालेत विविध उपक्रमांचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तळवडे नं. ९ या प्रशालेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यनिमित्त आयोजित क्रांती दिनादिवशी सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच राखी पौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या बांधून रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय स्वातंत्र्यांमध्ये योगदान देणाऱ्या सैनिकांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले. यात माजी सैनिक श्री प्रवीण लोके यांचा शाल व श्रीफळ देऊन तळवडे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. प्रमोद पावसकर सर यांनी सत्कार केला. यावेळी श्री प्रवीण लोके यांनी भारतीय स्वातंत्र्यांमध्ये सैनिकांचे योगदान या विषयावर विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले. तसेच केंद्रप्रमुखांनी सुद्धा विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. महिलांसाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात डॉक्टर भक्ती कांडरकर यांनी महिलांना आरोग्य विषयक अनमोल असे मार्गदर्शन केले. तसेच शालेय आवार स्वच्छता, हर घर तिरंगा जनजागृतीसाठी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ दिपाली हरमलकर, माजी सैनिक श्री. प्रविण लोके , केंद्रप्रमुख श्री.पावसकर, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष श्री अर्जुन आचरेकर, शिक्षण तज्ञ श्री आप्पा नागवेकर व बहुसंख्येने पालक व ग्रामस्थ वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री तळणकर सर यांनी केले व आभार सौ अनुराधा सावंत यांनी मानले.

You cannot copy content of this page