शांतादुर्गा हायस्कुलमध्ये वृक्ष रक्षाबंधन व वृक्षदिंडी संपन्न

⚡मालवण ता.१२-: श्रीदेवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत ‘आजादी का अमृत महोत्सव’अंतर्गत प्रशालेत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. वृक्ष आपल्याला प्राणवायू देत असल्याने वृक्ष आपले खरे रक्षणकर्ते आहेत या विचाराने रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी वृक्षाला राखी बांधली. तसेच विद्यार्थ्यांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’, झाडे लावा घरोघरी, पाऊस पडेल सरीवर सरी’ अशा घोषणा देत प्रशालेपासून वडाचापाट ग्रामपंचायत पर्यंत वृक्षदिंडी काढली.

वृक्षदिंडीच्या कार्यक्रमांसाठी इयत्ता आठवीतील विद्यार्थी कु.तन्मय दत्तात्रय राणे याने प्रशालेला चार काजू कलम भेट म्हणून दिली. प्रशालेत काजूची रोपे तन्मय राणे या विद्यार्थ्याच्या हस्ते लावून वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेतील मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी तन्मय आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार मानले.

आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत ‘हर घर तिरंगा’ संकल्पनेमध्ये ध्वजाचा अवमान होऊ नये म्हणून त्यासाठीची नियमावली आणि ध्वजाचा आदर कसा केला जावा याची माहिती चिंतामणी खोर्जुवेकर (एसी, रेफ्रिजरेटर प्रशिक्षक) यांनी विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी प्रशालेतील मुख्याध्यापक प्रसाद कुबल, शिक्षिका सौ.वेदिका दळवी, प्रतिभा केळुसकर, सौ. प्रीती सनये, आय.बी. टी निदेशक श्री. केशव भोगले, श्री.जनार्दन आंगणे, हर्षदा पाटकर, कविता माडये यासह प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page