Headlines

श्री रवळनाथ मंदिराचा दर्शनी भाग कोसळला; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली…

बांदा/प्रतिनिधीसावंतवाडी तालुक्यातील शेर्ले येथील श्री रवळनाथ मंदिराच्या दर्शनी भागाचा काही हिस्सा गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी परिसरात भाविकांची वर्दळ नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मंदिराच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंदिराच्या लाकडी छपराला तडे गेले होते. अखेर अतिवृष्टीमुळे दर्शनी भाग…

Read Full News

माठेवाड्यातील पाणी शिरण्यास पालिका प्रशासन जबाबदार…

संजू परब यांचा आरोप: गेल्या ५० वर्षांत अशी घटना प्रथमच; घटनास्थळी पाहणी करून अधिकाऱ्यांना दिल्या सूचना.. सावंतवाडी, ता.०२ : माठेवाडी परिसरात गटार तुंबल्यामुळे काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याची घटना अत्यंत गंभीर असून, गेल्या ५० वर्षांत अशी वेळ कधीच आली नव्हती. या प्रकाराला सावंतवाडी नगरपालिका प्रशासन व संबंधित ठेकेदार पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवक संजू परब…

Read Full News

मुक्ताई ॲकेडमीच्या सावंतवाडीतील कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराला विदयार्थ्यांचा मोठा प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.०२-: मुक्ताई ॲकेडमीने सावंतवाडी येथे पाच वर्षापासून पुढील, मुलांसाठी व मुलींसाठी एक दिवसाच्या कॅरम आणि बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. खासकीलवाडा येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात तब्बल सत्त्याण्णव मुलांनी आणि मुलींनी सहभाग घेतला. सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग आणि कणकवली येथील विदयार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.प्रशिक्षण शिबीराचे…

Read Full News

कुडाळ-पानबाजार येथील लॅबला आग लागून नुकसान…

⚡कुडाळ ता.०२-: शहरातील पानबाजार येथील क्षितिज अपार्टमेंट जवळच्या एका लॅबला आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. याबाबतची माहीती मिळताच कुडाळ नगरपंचायत आणि एमआयडीसीचा अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या फायर ब्रिगेडच्या गाड्यांच्या मदतीने पाण्याचा मारा करून वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र लॅबमधील साहित्य,…

Read Full News

कुडाळ रोटरी क्लबचे कार्य आदर्शवत…

सुहास जोशी:कुडाळ रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.. ⚡कुडाळ ता.०२-: विविध क्षेत्रात कुडाळ रोटरी क्लबने आदर्शवत काम केले आहे, असे गौरोवोद्गार पदग्रहण अधिकारी रो.डॉ. सुहास जोशी यांनी काढले. बुधवारी सायंकाळी रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून मकरंद नाईक, सेक्रेटरी म्हणून राकेश म्हाडदळकर आणि खजिनदार म्हणून डॉ. जयश्री केसरे…

Read Full News

*शेतीबरोबरच पशुधन टिकविल्यास कृषी उत्पन्न वाढीस चालना *

श्री. शंकर घारे ; केळूस येथे तालुकास्तरीय कृषीदिन व कृषीमेळावा संपन्न वेंगुर्लाभारत हा कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती घडविल्याने आज कृषी क्षेत्रात मोठे बदल दिसून येत आहेत. आज शेतीबरोबरच पशुधन टिकविण्यासाठी सर्वंकश प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी केळुस येथे बोलताना व्यक्त…

Read Full News

कोकण कृषी विद्यापीठाचे कृषी क्षेत्रात अमूल्य कार्य-:डॉ. संजय भावे…

⚡वेंगुर्ला ता.०१-: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने मागील कालावधीत कृषी क्षेत्रात संशोधनात्मक असे अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यामुळे आंबा- काजू बाबतीत रोजगार निर्मिती शक्य झाली आहे. बदलत्या हवामानामुळे आज जरी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्या, तरी पुढील कालावधीत कृषी विद्यापीठामार्फत योग्य संशोधनात्मक कार्य करण्यात येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. बाळासाहेब…

Read Full News

कणकवली काँग्रेस तालुकाध्यक्षपदाची धुरा प्रदीप मांजरेकर यांच्याकडे…

⚡कणकवली ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. काही नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. तर कणकवली तालुका अध्यक्षपदी प्रदीप मांजरेकर यांना पुन्हा नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच देवगड तालुकाध्यक्षपदी उमेश कुलकर्णी, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभय मालवणकर,…

Read Full News

डेअरी कॉलेजचा द्वितीय वर्षाचा निकाल ९५ टक्के ; सार्थक पाटील प्रथम…

⚡कणकवली ता.०१-: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर मान्यताप्राप्त तथा सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय, हरकुळ बुद्रुक (ता. कणकवली) येथील द्वितीय वर्षाच्या वार्षिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून महाविद्यालयाने ९५ टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये १३ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १५ विद्यार्थी…

Read Full News

कर्तव्यदक्ष प्रांताधिकाऱ्यांची गोरगरीब जनतेसाठी गरज…

प्रांताधिकाऱ्यांच्या समर्थनासाठीही काही संघटना, सामाजिक कार्यकर्ते सरसावले:मराठी शाळा वाचविण्यासाठीही आंदोलन व्हावे.. ⚡कणकवली ता.०१-: शिक्षक व कर्मचारी संघटनांनी प्रांताधिकाऱ्यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन छेडल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ काही सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्तेही पुढे सरसावले आहेत. सत्यशोधक संघटनेतर्फे याचा बॅनरही प्रांत कार्यालयानजीक लावण्यात आला असून त्यात प्रामाणिक व कर्तव्यदक्षपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी…

Read Full News

You cannot copy content of this page