Headlines

फोंडाघाटमध्ये अवैध दारू साठ्यावर छापा

32 हजार 580 रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त ⚡कणकवली ता.११-: कणकवली तालुक्यात फोंडाघाट येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 32 हजार 580 रुपयांची गोवा बनावटीची दारू व 15 हजार रुपये किमतीचा पत्र्याचा स्टॉल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 10 ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. व यासंदर्भात संशयित रामचंद्र उर्फ बाबू तांबे (फोंडाघाट हवेलीनगर) याच्या विरोधात…

Read More

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या

मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांची मागणी ⚡कणकवली ता.११-: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महसूल प्रशासनाने या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून नुकसानीचे पंचनामे करून भात व तत्सम पिकांचे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मोबदला जाहीर करावी असे निवेदन मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिले आहे. मागील…

Read More

बाळासाहेबांची शिवसेना गटाची तोफ आ शहाजी पाटील १५ रोजी जिल्ह्यात

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिन कार्यक्रमात लावणार उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.११-: भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा 15 ऑक्टोबरला वाढदिवस साजरा होत असून या वाढदिवसाला शिंदे गटाचे नेते आणि महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ आमदार शहाजी पाटील हे उपस्थित राहणार आहेत. शहाजी बापू पाटील हे पहिल्यांदाच कोकणात असून त्यांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी उसळणार आहे शहाजीबापू…

Read More

कै तानाजी कोळेकर यांच्या निर्धार घरांचे स्वप्नातील वास्तू सुपूर्द व सत्कार कार्यक्रम १३ रोजी

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.११-: सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या समाजप्रिय दानशूर व्यक्ती व क्रीडा यांच्या पुढाकारातून सावंतवाडीतील प्रसिद्ध क्रिकेटपटू कै. तानाजी कोळेकर यांच्या निर्धार घराचे स्वप्न साकार करण्यासाठी हातभार लावणाऱ्या दानशूर व्यक्तींचा सत्कार समारंभ व वास्तू सुपुद सोहळा गुरुवारी दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या शुभ हस्ते…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मानसिक तणाव बाबत मार्गदर्शन

अदिती कशाळीकर यांची उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे समुउपदेशिका श्रीमती अदिती कशाळीकर यांनी मानसिक तणावाची कारणे, शिक्षण, भविष्य , नातेसंबंध, कामाच्या ठिकाणी तणाव या बद्दल माहिती देत, समुउपदेशांबाबत मार्गदर्शन केले आहे. यावेळी अपघातानंतर, व खराब जीवन शैली मुळे येणारे नैराश्य, तसेच मानसिक आरोग्य समस्या म्हणजे नैराश्य, चिंता विकार, स्मृतिभ्ंश, सिझोफ्रेनिया, इत्यादी आजाराबाबत कशा प्रकारे…

Read More

मळगाव येथील रवळनाथ मंदिरातील जागर उत्सवास सुरूवात

जागर उत्सव कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम ⚡सावंतवाडी ता.११सहदेव राऊळ-: मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरातील जागर उत्सवास मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. या जागर उत्सव कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात दरवर्षी कोजागिरी पोर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत जागर उत्सव होत असतो. महिनाभर सुरू…

Read More

गिर्येत मच्छिमार मेळावा संपन्न

बांदेवाडी मच्छिमार सोसायटीचे आयोजन ⚡देवगड ता.१०-: गिर्ये बांदेवाडी मच्छीमार सोसायटीच्या वतीने,नुकताच मच्छीमार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मच्छीमार बांधवांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती सांगण्यासाठी फिशरिजचे अधिकारी श्री महाकाल , तसेच मच्छीमार अपघात विमा योजनेची माहिती देण्यासाठी देवगड पोस्ट ऑफिस चे अधिकारी श्री धुरी. सोबत बांदेवाडी मच्छीमार सोसायटी सर्व संचालक मंडळाचे सदस्य, रामेश्वर…

Read More

स्वस्थ बालक स्पर्धेत चैतन्य करलकर व आराध्या परब प्रथम

महिला व बालविकास विभागामार्फत घेण्यात आल्या स्पर्धा मालवण, दि प्रतिनिधीमहिला व बाल विकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या स्वस्थ बालक स्पर्धेत सहा महिने ते तीन वर्ष या वयोगटात चैतन्य करलकर तर तीन वर्षे ते पाच वर्षे वयोगटात आराध्या परब यांनी प्रथम क्रमांक पटकावला.महिला व बाल विकास विभागामार्फत दरवर्षी सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून राबविला जातो. या महिन्यात…

Read More

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने उद्या मालवणात फनी गेम्स स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.१०-: मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते श्री सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्यावतीने आणि भवानी मित्रमंडळ गवंडीवाडा यांच्या सहकार्याने मंगळवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत या वेळेत भवानी मंदिर गवंडीवाडा येथे महिलांसाठी तसेच पंधरा वर्षाखालील मुलांसाठी फनी गेम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या महिलांना आकर्षक पैठणी बरोबरच बक्षिसे देण्यात…

Read More

मालवणात खलाशाचा मृत्यू

आकस्मिक मृत्यू म्हणून पोलिसात नोंद मालवण दि प्रतिनिधीमालवण येथे मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून कामास असलेल्या काशिनाथ सीताराम सरोदे (वय ५७) रा. लांजा रत्नागिरी यांना मासेमारी दरम्यान सोमवारी दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अशी…

Read More
You cannot copy content of this page