Headlines

मालवण नगर वाचन मंदिरतर्फे तालुकास्तरीय वाचक स्पर्धा

⚡मालवण ता.०६-: मालवण नगर वाचन मंदिरतर्फे तालुकास्तरीय वाचक (वक्तृत्व) स्पर्धेचे आयोजन दि. २७ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे. स्पर्धेचा विषय ‘मधु मंगेश कर्णिक यांची कोणतीही साहित्यकृती’ (सादरीकरण १० मिनिटे) असा आहे. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या तीन स्पर्धकांना जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा रा. ब. शिवाजी देसाई वाचनालय कुडाळ…

Read More

लेफ्टनंट दीपाली गावकर हीचा परीट संघातर्फ़े सत्कार

⚡मालवण ता.०४-: कुडाळ तालुक्यातील बाव येथील परीट समाजातील शेतकरी कुटुंबातील सुकन्या दीपाली विजय गावकर यांनी सैन्य दलातील लेफ्टनंट अधिकारी पदापर्यंत मजल मारल्याबद्दल श्री संत गाडगे महाराज परीट संघ मालवणच्या वतीने दीपाली हिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या बाव येथील दीपाली विजय गावकर यांनी लेफ्टनंट अधिकारी पदापर्यंत मजल मारल्याने दिपालीचे सर्वत्र कौतुक होत आहे…

Read More

रेडी येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡वेंगुर्ला ता.०६-: रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रितेश राऊळ मित्रमंडळाच्या वतीने कै.चंद्रकांत उर्फ निलेश राऊळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १४ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ३७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. उद्घाटन माजी सभापती अजित सावंत व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर तसेच जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते झाले.यावेळी व्यासपीठावर माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कामत, चित्रा कनयाळकर,…

Read More

“त्या” कामांच्या चौकशीबाबत भाजप युवा मोर्चाचे वेधले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष….

वेंगुर्ला प्रतिनिधी- रेडी ते रेवस सागरी महामार्गावरील उभादांडा ते शिरोडा रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत तसेच उभादांडा सागरेश्वर किना-यावरील पर्यटन विकास महामंडळ विभागामार्फत उभारलेल्या वुडन अँड हाऊस प्रकल्पाची चौकशी करण्याबाबत प्रश्नांवर भाजप युवा मोर्चाच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले. याबाबत त्यांना…

Read More

फुगडी स्पर्धेत सखी संघ तर वारकरी भजन स्पर्धेत केपादेवी मंडळ प्रथम

⚡वेंगुर्ला ता.०६-: अणसूर येथील श्री देवी सातेरी कला क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या ३ दिवसीय भव्य संगीत महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी घेतलेल्या खुल्या फुगडी स्पर्धेत सखी फुगडी संघ पावशी यांनी तर वारकरी भजन स्पर्धेत श्री केपादेवी वारकरी भजन मंडळ, मूठ यांनी विजेतेपद पटकावले.

Read More

नुसते खड्डे बुजवू नका; तात्काळ नवीन पुलाचे काम करा…

पंधरा दिवसात पुलाच्या कामास सुरुवात न केल्यास उपोषण; उपसरपंच गणपत डांगी यांचा इशारा ⚡दोडामार्ग ता.०६-: नुसते खड्डे बुजवण्याचे काम नको.तर तात्काळ नवीन पुलाचे काम हाती घ्या येत्या पंधरा दिवसांत प्रत्यक्ष पुलाच्या कामाची सुरुवात न केल्यास त्याच कॉजवेवर उपोषण करणार असा इशारा साटेली भेडशी उपसरपंच गणपत डांगी यांनी दिला आहे. दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावरील भेडशी येथील कॉजवेलाछोटे…

Read More

मालवण शहरातील पक्षीगणनेत ९८ प्रजातींच्या ७४८ पक्षांची नोंद

⚡मालवण ता.०५-: पक्षी सप्ताहाचे औचित्य साधून, रानमित्र टुरिझम आचरा तर्फे मालवण शहरातील पक्षीगणनेचा अभिनव उपक्रम आज राबविण्यात आला. या पक्षीगणनेत मालवण मधील सागरी महामार्ग परिसर (आचरा रोड ), आडवण परिसर आणि गणेश मंदिर ते रॉक गार्डन या परिसरात पक्षीगणना करण्यात आली. या गणनेत एकूण ९८ प्रजातींच्या ७४८ पक्षांची नोंद करण्यात आली. या पक्षी गणनेत लहान…

Read More

मेढा राजकोट येथील जेटी कामास पर्यावरण विभागाची परवानगी मिळावी

माजी नगरसेवक गणेश कुशे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी ⚡मालवण ता.०५-: मालवण शहरातील मेढा राजकोट समुद्र किनाऱ्यावर मत्स्य जेटी (फिश लँडींग सेंटर ) मंजूर असून त्यास अद्याप. पर्यावरण विभागाची मान्यता न मिळालेली नाही. त्यामुळे ही जेटी अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. ही जेटी झाल्यास मच्छिमारांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होवून मच्छिमारांचा व्यवसाय करणे सुलभ होऊ शकते. त्यामुळे…

Read More

ऑनलाइन फसवणुकीला व्यापाऱ्यांनी बळी पडू नये – नितीन वाळके

⚡मालवण ता.०५-: जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसोबत ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले असून यात अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. यापूर्वी या ऑनलाइन फसवणुकीत परप्रांतीय हिंदी भाषिक व्यक्तींचा समावेश असायचा, मात्र आता व्यापाऱ्यांना येणाऱ्या बनावट कॉल्समध्ये मराठी व मालवणी बोलणाऱ्या व्यक्तींचाही समावेश असल्याने आता ऑनलाइन गंडा घालणाऱ्या व्यक्ती या महाराष्ट्रातील किंबहुना जिल्ह्यातील असण्याचा संशय सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाला असून…

Read More

टेडीमेडीसिनच्या माध्यमातून डॉकटर, उपचार होणार उपलब्ध

भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचार प्रसिध्दी करावी;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन ⚡बांदा ता.०५-: नवीन तंत्रज्ञान व गतिमान व्यवस्थेत टिकण्यासाठी टेलिमेडिसिनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ मोफत उपचार व मुंबईतील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला उपलब्ध होणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या सुविधेचा ग्रामीण भागात प्रचार व प्रसार करण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र…

Read More
You cannot copy content of this page