मेढा राजकोट येथील जेटी कामास पर्यावरण विभागाची परवानगी मिळावी

माजी नगरसेवक गणेश कुशे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

⚡मालवण ता.०५-: मालवण शहरातील मेढा राजकोट समुद्र किनाऱ्यावर मत्स्य जेटी (फिश लँडींग सेंटर ) मंजूर असून त्यास अद्याप. पर्यावरण विभागाची मान्यता न मिळालेली नाही. त्यामुळे ही जेटी अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. ही जेटी झाल्यास मच्छिमारांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होवून मच्छिमारांचा व्यवसाय करणे सुलभ होऊ शकते. त्यामुळे या जेटीस पर्यावरण विभागाची मान्यता मिळवून द्यावी अशी मागणी मालवणचे माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबतचे निवेदन गणेश कुशे यांनी मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांना सादर केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरामधील किनारपट्टी भागामधे मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय चालतो. मालवण शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये सुमारे २०० फिशिंग ट्रोलर्स आणि असंख्य छोट्या मासेमारी नौका गेल्या अनेक वर्षापासून मासेमारी चा व्यवसाय करतात परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय असूनही या परिसरामध्ये एक ही मत्स्य जेटी उपलब्ध नाही. त्यामुळे माछिमाराना ट्रॉलरमधून मच्छी उतरविणे, ट्रॉलर मध्ये बर्फ, डिझेल चढविणे ही कामे करताना कसरत करावी लागते त्या साठी स्थानिक मच्छिमारांच्या मागणी नुसार मालवण शहरातील मेढा राजकोट भागामधे मत्स्य जेटी (फिश लँडींग सेंटर) मंजूर आहे. परंतु त्यास पर्यावरण विभागाची मान्यता न मिळाल्यामुळे ती जेटी अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. मात्र तिथून जवळच नव्याने प्रवासी जेटी बांधण्यात आली असून त्यास पर्यावरण विभागाची मान्यता मिळाल्याचे समजते. त्याच धर्तीवर या मत्स्य जेटीस देखील पर्यावरण विभागाने परवानगी दिल्यास मछिमारांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होवून त्यांची त्यांना होणा या त्रासापासून मुक्तता होऊ शकते आणि माछिमारीचा व्यवसाय करणे अजून सुलभ होऊ शकते. तरी सदर मत्स्य जेटीस पर्यावरण विभागाची मान्यता मिळवून देऊन जेटीचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात संबंधित विभागाना आदेशीत करावे, अशी मागणी गणेश कुशे यांनी निवेदनात केली आहे.

You cannot copy content of this page