टेडीमेडीसिनच्या माध्यमातून डॉकटर, उपचार होणार उपलब्ध

भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचार प्रसिध्दी करावी;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

⚡बांदा ता.०५-: नवीन तंत्रज्ञान व गतिमान व्यवस्थेत टिकण्यासाठी टेलिमेडिसिनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ मोफत उपचार व मुंबईतील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला उपलब्ध होणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या सुविधेचा ग्रामीण भागात प्रचार व प्रसार करण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलिमेडिसिन निदान व उपचार सुविधा केंद्राचे लोकार्पण मंत्री चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, प्रवक्ते संजू परब, तहसीलदार श्रीधर पाटील, डॉ. श्रीपाद पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डॉ. मयुरेश पटवर्धन, समुदाय वैद्यकीय अधिकारी तेजस्विनी माजगावकर, ग्रामविस्तार अधिकारी लीना मोर्ये, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, श्वेता कोरगावकर, उन्नती धुरी, मानसी धुरी, शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान, जावेद खतीब, मकरंद तोरसकर बाळू सावंत आदीसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page