मालवण नगर वाचन मंदिरतर्फे तालुकास्तरीय वाचक स्पर्धा

⚡मालवण ता.०६-: मालवण नगर वाचन मंदिरतर्फे तालुकास्तरीय वाचक (वक्तृत्व) स्पर्धेचे आयोजन दि. २७ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे. स्पर्धेचा विषय ‘मधु मंगेश कर्णिक यांची कोणतीही साहित्यकृती’ (सादरीकरण १० मिनिटे) असा आहे. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या तीन स्पर्धकांना जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धा रा. ब. शिवाजी देसाई वाचनालय कुडाळ येथे ४ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. नावनोंदणीसाठी श्रेया चव्हाण (८३९०६९४३३१) यांच्याशी २२ नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन उदयराव मोरे व नागेश कदम यांनी केले आहे.

You cannot copy content of this page