⚡मालवण ता.०४-: कुडाळ तालुक्यातील बाव येथील परीट समाजातील शेतकरी कुटुंबातील सुकन्या दीपाली विजय गावकर यांनी सैन्य दलातील लेफ्टनंट अधिकारी पदापर्यंत मजल मारल्याबद्दल श्री संत गाडगे महाराज परीट संघ मालवणच्या वतीने दीपाली हिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
बाव येथील दीपाली विजय गावकर यांनी लेफ्टनंट अधिकारी पदापर्यंत मजल मारल्याने दिपालीचे सर्वत्र कौतुक होत आहे दीपाली गावकर हिचा बंधूची लष्करात सेवा बजावत आहे दीपाली या परीट समाजाच्या असून श्री संत गाडगे महाराज परीट संघ मालवणने दिपालीच्या निवासस्थानी जाऊन यथोचित सत्कार केला दीपाली हिला परीट संघाचे तालुका अध्यक्ष मोहन वालकर यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले.
यावेळी दीपाली हिच्या या यशाबद्दल परीट समाजाला तिचा अभिमान आहे, असे श्री मोहन वालकर यांनी सांगत दीपाली हिला शुभेच्छा दिल्या. यावेळी संघाचे सचिव विनायक चव्हाण, खजिनदार आपा परुळेकर, सदस्य उत्तम चव्हाण, किरण चव्हाण, अनिल चव्हाण, सत्यवान चव्हाण आदी उपस्थित होते.
