वाफोली माऊलीचा जत्रोत्सव १६ रोजी
सकाळपासून सुरू होणार धार्मिक कार्यक्रम बांदा/प्रतिनिधीसावंतवाडी तालुक्यातील वाफोली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक १६ रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळपासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. केळी, खणा नारळाने ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा होणार असून मामा मोचेमाडकर यांचा पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग…
