तर व्हाईस चेअरमन सहदेव सावंत यांची बिनविरोध निवड
⚡बांदा ता.१४-: इन्सुली सहकारी दुग्ध संख्येची सन २०२२ -२० २८ या कालावधीसाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली होती आज सोमवार दि. १४ रोजी निवडणूक अधिकारी एम् एस धुमाळ यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेतली यावेळी चेअरमन म्हणून गुरुनाथ पेडणेकर तर व्हाईस चेअरमन पदी सहदेव सावंत यांची बिनविरोध निवड घोषित केली.
यावेळी उपस्थित निवृत्त पोलिस निरीक्षक अशोक आप्पा सावंत विद्या विकास मंडळ सचिव विकास केरकर अध्यक्ष उमेश पेडणेकर यांनी अभिनंदन केले या वेळी सावंत यांनी संस्थेचे संचालक गेली आठ वर्षे करत असलेले कार्य इन्सुली गावासाठी अभिमानाची बाब आहे गावत दुध गंगा येण्यासाठी सर्वानी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे यावेळी पेडणेकर यांनी इन्सुली ‘ गावातील शेतकरी वर्गाचे दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी दुध व्यवसायाकडे शेती पूरक म्हणून न पाहता व्यावसायिक बनावे जिल्हा बँकेच्या माध्यमातून दुध उत्पादक शेतकऱ्यांना विविध योजना तयार करण्यात आल्या आहेत त्याचा फायदा करून घेवून आपली आर्थिक उन्नती साधावी यासाठी संख्येच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल याप्रसंगी विकास केरकर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी विकास सोसायटी संचालक शांताराम बांदिवडेकर साबाजी परब माजी ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी सुधिर गावडे संस्था सचिव संजय सावंत संचालक महेंद्र पालव ‘ सखाराम बागवे विलास गावडे विसोबा पालव भागू पाटील . सौ सुहानी सुधिर गावडे सौ गितांजली गुरुनाथ हळदणकर सेल्समन महादेव मे स्त्री अशोक पडवळ आदी उपस्थित होते
