सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाजातर्फे लेफ्टनंट दिपाली गावकर हिचा गौरव…

सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या हस्ते सत्कार

⚡सावंतवाडी ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्यावतीने परीट समाजातील कन्या लेफ्टनंट दिपाली गावकर हिचा सत्कार परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी लेफ्टनंट दिपाली गावकर हिचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर म्हणाले, या पंचवीस वर्षीय सिंधू कन्येने जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय सैन्यात लेफ्टनन पदी नियुक्त होण्याचा मान मिळवला.तिने देशसेवेसाठी सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला.

ग्रामीण भागातील या युवतीने इतरांसमोर आदर्श ठेवला आहे तिच्या यशाने सिंधुदुर्ग जिल्हयाची व परीट समाजाची मान व शान उंचावली आहे.तसेच गरीब शेतकरी कुटुंबातील व शेतात कष्ट करून शिक्षण पूर्ण करीत आपले सैन्य दलात लेफ्टनंट होण्याचे ध्येय गाठणाऱ्या व तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या तिच्या आईवडिलांसह कुटुंबाचे कौतुक केले.

तसेच लेफ्टनंट दिपाली गावकर म्हणाली, आपल्या सैन्य भरतीमध्ये आई वडील व भाऊ भूषणचे मोलाचे योगदान लाभले. वेळोवेळी त्यांनी मला साथ दिली याचे श्रेय मी माझ्या आई-वडिलांना व भावाला देते.

तसेच परीट समाजाने केलेल्या सत्कारसोहळ्यामुळेआपण भारावून गेली आहे. हा सत्कार माझ्यासाठी विशेष आहे. मी आयुष्यात कधीच हा सत्कार विसरू शकणार नाही.

यावेळी परीट समाजाचे तालुकाध्यक्ष राजू भालेकर यांनी व इतर मान्यवरांनी तिला तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर, दयानंद रेडकर, प्रदीप भालेकर, चरण कासकर, योगेश आरोलकर, जितेंद्र मोरजकर, भगवान वाडकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page