पूर्ण प्राथमिक शाळा दोडामार्ग येथे बालदिन साजरा

⚡दोडामार्ग ता.१४-: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग, तालुका विधी सेवा समिती दोडामार्ग व वकील संघटना दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज पूर्ण प्राथमिक शाळा दोडामार्ग येथे बालदिन साजरा करण्यात आला.
मुलांना खाऊ वाटून व त्यांचा गुणगौरव करून, चाचा नेहरूंच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले.

यावेळी ऍड पविण नाईक, कोर्ट स्टाफ चौधरी, प्राथमिक शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

You cannot copy content of this page