वेंगुर्ले न. प. चे नवे मुख्याधिकारी श्री. पारितोष कंकाळ

⚡वेंगुर्ले ता.१४-: वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी आता श्री. पारितोष कंकाळ हे नवे मुख्याधिकारी रुजू झाले आहेत.
वेंगुर्ले नगर परिषदेमध्ये तीन वर्ष सेवा बजावल्याने अमित कुमार सोंडगें यांची प्रशासकीय बदली झाली आहे. विद्यमान नगर परिषदेतील नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा पाच वर्षांचा कालावधी संपल्यामुळे सध्या प्रशासकीय कारभार सुरू आहे. दरम्यान सोंडगे यांच्या जागी श्री. पारितोष कंकाळ यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. कंकाळ हे सध्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. वेंगुर्ले येथे त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयाच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक संगीता कुबल आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

You cannot copy content of this page