Headlines

मालवण बाजारपेठ चर्मकार वसाहत येथील रखडलेले रस्ता गटार काम तात्काळ सुरू

⚡मालवण ता.२४-:मालवण बाजारपेठ दलितवस्ती चर्मकार वसाहत येथील रस्ता गटाराच्या बांधकामासाठी मालवण नगरपरिषदेकडून २८ लक्ष एवढ्या निधीची तरतूद करून निविदा प्रक्रिया होऊनही व फेब्रुवारी २०२२ मध्ये कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू न झाल्याने भाजप युवा मोर्चा मालवण। शहर उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांनी माजी खासदार निलेश राणे।यांचे लक्ष वेधल्यानंतर आज या कामाला नगरपालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे…

Read More

देवगडात सुद्धा वीज समस्यांचा पाऊस

वीज वितरण मेळाव्यात नागरिकांनी मांडल्या समस्या देवगडमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, देवगड तालुका व्यापारी संघटना, ग्राहक पंचायत देवगड, यांच्या सहकार्याने वीज ग्राहक मेळाव्याचे आयोजन गुरुवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी श्रीकृष्ण मंगल कार्यालय जामसंडे या ठिकाणी करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले….

Read More

ग्रामपंचायत निवडणूक मनसे लढविणार

गाव पॅनलला पाठिंबा: पक्षीय निवडणुकीत मनसे उमेदवार असणारराज्य सरचिटणीस परशुराम उपरकर मालवण (प्रतिनिधी) आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उमेदवार मालवण तालुक्यात ग्रा.प. निवडणूक लढविणार असून काही ठिकाणी मनसेचे उमेदवार निवडणुकीपूर्वीच बिनविरोध उमेदवार ठरले आहेत. ज्या गावात गाव पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविली जाईल तिथे मनसे गाव पॅनलला पाठिंबा देणार असून जिथे पक्षीय लढत असेल तिथे मनसे पक्ष…

Read More

कट्टा गुरामवाडी येथे २६ रोजी गोंधळ उत्सव

⚡मालवण ता.२४-: कट्टा गुरामवाड येथील श्री देवी भराडीचा वार्षिक गोंधळ उत्सव शनिवार, २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. माहेरवाशिणी, भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गुरामनगरी ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

Read More

साळेलच्या गिरोबाचा १ डिसेंबर रोजी जत्रोत्सव

⚡मालवण ता२४-:मालवण तालुक्यातील साळेल गावाचे ग्रामदैवत श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार १ डिसेंबर रोजी होत आहे. यानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देव लिंगेश्वर मंदिरातून पालखी श्री देव गिरोबा मंदिरात आणली जाते. रात्री ११ वाजता पालखी प्रदक्षिणा सोहळा झाल्यांनतर बाळकृष्ण गोरे पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ कवठी-कुडाळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. शुक्रवारी…

Read More

मनसे अध्यक्ष राज ठाकरे १ रोजी मालवणात मुक्कामास; कार्यकर्ते व नागरिकांशी साधणार संवाद

परशुराम उपरकर यांची माहिती ⚡मालवण ता.२४-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ३० नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून १ डिसेंबर रोजी ते मालवणात वास्तव्यास असणार आहेत. मालवणच्या भेटीत राज ठाकरे कार्यकर्त्यांशी बैठक घेणार असून पत्रकार व प्रतिष्ठित नागरिकांशीही चर्चा करणार आहेत, तसेच २ डिसेंबर रोजी सकाळी आंगणेवाडी येथे भराडी देवीचे दर्शन घेणार…

Read More

मालवणात २६ रोजी संविधान जनजागृतीपर कार्यक्रम

⚡मालवण ता.२४-: भारताच्या संविधान दिनाचे औचित्य साधून दक्ष युवक भारत संघटनेमार्फत दि. २६ नोव्हेंबर रोजी मालवण एसटी स्टँड परिसर येथे सकाळी १० वाजता भारताचे संविधान विषयी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर २०२२ ते २६ जानेवारी २०२३ म्हणजेच भारताच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत दक्ष युवक भारत संघटनेमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागात राबवले जाणार…

Read More

मालवणात 25 रोजी कर्करोगविषयी चर्चासत्र

⚡मालवण ता.२५-: लायन्स क्लब मालवण, मालवण व्यापारी संघ, दैवज्ञ समाज मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने व्ही केअर संस्थेमार्फत कर्करोगा संबधीत माहिती आणि चर्चासत्र दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १२ यावेळेत दैवज्ञ भवन मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये व्ही केअर संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योती पाटील शाह, कार्यक्रम अधिकारी अंकिता आंबोलकर, रुग्ण समुपदेशक…

Read More

समुद्रात बेपत्ता झालेल्या खलाशाचा मृतदेह सापडला

⚡मालवण ता.२४-: मालवणच्या समुद्रात मासेमारी बोटीवरून पडून समुद्रात बेपत्ता झालेल्या दिनामानी धरम टपनो (वय ३०) (रा. ओडीसा, सध्या रा. मालवण) या खलाशाचा मृतदेह आज सकाळी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील समुद्रात स्थानिक मच्छीमारांना सापडून आला. हा मृतदेह मालवण पोलिसांनी बोटीतून किनाऱ्यावर आणत ताब्यात घेतला आहे. सोमवार दि. २१ नोव्हेंबर रोजी मालवण समुद्रात मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून काम…

Read More

युवा सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सेनेच्या नेत्यांनी केले अभिनंदन

गौरीशंकर खोत,सतीश सावंत,संदेश पारकर, सुशांत नाईक यांनी दिल्या शुभेच्छा ⚡कणकवली ता.२४-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातीलयुवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेच्या नेतेमंडळी, पदाधिकारी आणि युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर…

Read More
You cannot copy content of this page