⚡मालवण ता२४-:
मालवण तालुक्यातील साळेल गावाचे ग्रामदैवत श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार १ डिसेंबर रोजी होत आहे. यानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री देव लिंगेश्वर मंदिरातून पालखी श्री देव गिरोबा मंदिरात आणली जाते. रात्री ११ वाजता पालखी प्रदक्षिणा सोहळा झाल्यांनतर बाळकृष्ण गोरे पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ कवठी-कुडाळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. शुक्रवारी पहाटे दहीहंडी फोडून जत्रोत्सवाची सांगता होते. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन साळेल हितवर्धक समाज, मुंबई व साळेल ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
