⚡मालवण ता.२४-: भारताच्या संविधान दिनाचे औचित्य साधून दक्ष युवक भारत संघटनेमार्फत दि. २६ नोव्हेंबर रोजी मालवण एसटी स्टँड परिसर येथे सकाळी १० वाजता भारताचे संविधान विषयी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर २०२२ ते २६ जानेवारी २०२३ म्हणजेच भारताच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत दक्ष युवक भारत संघटनेमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागात राबवले जाणार आहेत. भारताचे संविधान विषयी व मुलभूत हक्क आणि कर्तव्य याबाबत जनजागृती करणे हे या कार्यक्रमांचे मुख्य उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
