Headlines

संस्थानकालिन सावंतवाडीच्या आठवणी जागवा आणि व्यक्त व्हा

कोकण मराठी साहित्य परिषदेचा कार्यक्रम;१० डिसेंबर रोजी आयोजन ⚡सावंतवाडी ता.०२-: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यांच्यावतीने संस्थानकालीन सावंतवाडी शहरातील जुन्या आठवणी जागवा आणि व्यक्त व्हा हा उपक्रम शनिवारी १० डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीराम वाचन मंदिर समोरील मोती तलावाच्या सेल्फी पॉइंट कट्ट्यावर होणार आहे. अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष…

Read More

समीर वंजारी यांनी दिल्या अर्चना घारे परब यांना शुभेच्छा

सावंतवाडी ता.०२-: राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र सोहमं वंजारी उपस्थित होते.

Read More

राज ठाकरे यांचे कणकवलीत जल्लोषी स्वागत; जोरदार घोषणाबाजी

⚡कणकवली ता.०२-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कणकवली शहरात शुक्रवारी दुपारी १ वाजता च्या सुमारास आगमन झाले. यावेळी कणकवली पटवर्धन चौक येथे त्यांचे ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नादगांवकर,अमित ठाकरे,प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री,तालुकाध्यक्ष दत्ताराम…

Read More

जीवनविद्या मिशनतर्फे कासार्डे येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर,व्याख्यान आणि कीर्तन

⚡कणकवली ता.०२-:सद्गुरू श्री. वामनराव पै यांच्या १०० व्या जन्म शताब्दी जयंती निमित्ताने गुरुवार ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत श्री दत्तात्रय सेवा मंडळ, कासार्डे भोगले पारकर वाडी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथे मोफत भव्य प्राथमिक आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. *यानिमित्त सकाळी ९ ते १० या वेळेत डॉ. सुभाष पाटील…

Read More

पर्यटन महोत्सवानिमित्त स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमासाठी 4 रोजी बैठक

बैठकीला उपस्थित राहण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन ⚡कणकवली ता.०२-: कणकवली नगरपंचायत आयोजित पर्यटन महोत्सव 5 जानेवारी ते 8 जानेवारी 2023 रोजी कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोर होणार आहे. त्यानिमित्त 6 जानेवारी रोजी शहरातील व जिल्ह्यातील नवोदित आणि नामवंत 200 कलाकारांच्या संचात 3 तासांचा स्टेज शो होणार आहे. या कार्यक्रमात गायन, वादन, नृत्य, अभिनय, मिमिक्री, स्किट…

Read More

माजगाव दत्तमंदिरमध्ये दत्तजयंती उत्सवाचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.०२-: माजगाव येथील दत्तमंदिर येथे दत्तजयंती निमित्त दत्तजयंती उत्सव साजरा होणार असून, या उत्सवास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री गुरुदेव दत्त देवस्थान कडून करण्यात आले आहे. यावेळी बुधवार दिनांक ७ डिसेंबर रोजी पहाटे पासून धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, रात्री १२ वाजता श्रीचा जन्म उत्सव होणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक ८…

Read More

नरडवे हायस्कुलच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा

⚡कणकवली ता.०२-:अखिल नरडवे ग्रामोध्दार संघ संचालित नरडवे इंग्लिश स्कूल, नरडवे या हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच मुंबई येथे संपन्न झाला. या मेळाव्यात १९६३ ते २०२२ पर्यतच्या बॅचचे माजी विद्यार्थी उपस्थित झाले होते. परळ येथील दामोदर नाट्यगृहाच्या परिसरातील सोशल सर्विस लिग हायस्कूलच्या ए. सी. सभागृहात झालेल्या या मेळाव्यात मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते बॅडमिंटन खेळाडू प्रदीप…

Read More

आयडियल इंग्लिश स्कूलचा ‘वन डे’ मार्केट उपक्रम अतिशय स्तुत्य:
चंद्रशेखर देसाई

⚡कणकवली ता.०२-: मुलांना व्यवहारीक ज्ञान मिळण्याच्यादृष्टीने ‘वन डे’ मार्केट हा आयडियल इंग्लिश स्कूलचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. अशा उपक्रमांचे अनुकरण इतर शाळांमध्येही व्हायला हवे. यातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळते, असे प्रतिपादन तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांनी केले. ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यु. कॉलेज वरवडे येथे वन डे मार्केट अर्थात एक…

Read More

सावंतवाडी येथे ३ डिसेंबर रोजी दिव्यांग बांधवांसाठी मोफत कार्यशाळा

⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी येथील दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक बांधिलकी सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर रोजी सावंतवाडी एस टी स्टँड समोर, काझी शाहबुद्दीन हॉल, येथे जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांग बांधवांसाठी मोफत कार्यशाळा व जनजागृती मोहीम आयोजित केली आहे. ही कार्यशाळा सकाळी 10:30 तें दुपारी 3:30 या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमात अध्यक्ष…

Read More

कालपासून बेपत्ता असलेली महिला सापडली

सामाजिक बांधिलकीच्या टीमने सुपूर्द केले नातेवाईकांकडे सावंतवाडी : गुरुवारी दुपारपासून मिलाग्रीन फर्नांडिस (४२) ही महिला बेपत्ता झाली होती. आज दुसऱ्या दिवशी सकाळी ती आकेरी हुमरस येथील खान मोहल्ला जवळ कुडाळच्या दिशेला जाताना सामाजिक बांधिलकीच्या आपत्कालीन टीमला सापडली. या टीमने तिला नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द केले आहे. यामुळे नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला आहे.

Read More
You cannot copy content of this page