आयडियल इंग्लिश स्कूलचा ‘वन डे’ मार्केट उपक्रम अतिशय स्तुत्य:
चंद्रशेखर देसाई

⚡कणकवली ता.०२-: मुलांना व्यवहारीक ज्ञान मिळण्याच्यादृष्टीने ‘वन डे’ मार्केट हा आयडियल इंग्लिश स्कूलचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. अशा उपक्रमांचे अनुकरण इतर शाळांमध्येही व्हायला हवे. यातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळते, असे प्रतिपादन तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांनी केले.

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यु. कॉलेज वरवडे येथे वन डे मार्केट अर्थात एक दिवसाचा बाजार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. देसाई बोलत होते. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच आर्थिक व्यवहारज्ञानही आत्मसात करण्याच्या हेतूने दरवर्षी हा उपक्रम आयडियलमध्ये राबविला जातो. यात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी भाज्या, विविध उत्पादने, खाद्यपदार्थ यांची गावातील लोकांना विक्री केली.

यावेळी वरवडे सरपंच प्रभाकर बांदल, ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल, संचालक दयानंद उबाळे, यज्ञेश शिर्के, मुख्याध्यापिका अर्चना देसाई, सुप्रिया तायशेटे, श्री. येंडे व इतर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहा शिक्षिका विशाखा जाधव, योगेश सामंत, वसुधा वारंग, श्री. नीलेश यांनी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन हेमंत पाटकर यांनी केले.

You cannot copy content of this page