पर्यटन महोत्सवानिमित्त स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमासाठी 4 रोजी बैठक

बैठकीला उपस्थित राहण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन

⚡कणकवली ता.०२-: कणकवली नगरपंचायत आयोजित पर्यटन महोत्सव 5 जानेवारी ते 8 जानेवारी 2023 रोजी कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोर होणार आहे. त्यानिमित्त 6 जानेवारी रोजी शहरातील व जिल्ह्यातील नवोदित आणि नामवंत 200 कलाकारांच्या संचात 3 तासांचा स्टेज शो होणार आहे.

या कार्यक्रमात गायन, वादन, नृत्य, अभिनय, मिमिक्री, स्किट आणि इतर कलाप्रकार यांचे सादरीकरण होणार आहे. तरी इच्छूक कलाकारांनी 4 डिसेंबर 2022 रोजी सांय 7वाजता नगरवाचनालय हॉल दुसरा मजला कणकवली येथे हजर राहावे. अधिक माहितीसाठी सुहास वरूणकर 8600249624, प्रा. हरिभाऊ भिसे 9422633023, संजय मालंडकर 9422394222 यांच्याशी संपर्क साधावा. कार्यक्रम सुरळित पार पाडणे, रूपरेषा ठरवणे, कलाकर सहभाग या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page