जीवनविद्या मिशनतर्फे कासार्डे येथे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर,व्याख्यान आणि कीर्तन

⚡कणकवली ता.०२-:
सद्गुरू श्री. वामनराव पै यांच्या १०० व्या जन्म शताब्दी जयंती निमित्ताने गुरुवार ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत श्री दत्तात्रय सेवा मंडळ, कासार्डे भोगले पारकर वाडी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथे मोफत भव्य प्राथमिक आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

*यानिमित्त सकाळी ९ ते १० या वेळेत डॉ. सुभाष पाटील यांचे शरीर साक्षात परमेश्वर या विषयावर मार्गदर्शन होईल, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता प्राथमिक आरोग्य चिकित्सा शिबिर राबविण्यात येईल आणि सायंकाळी ९ ते १० वाजता किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
जीवनविद्या मिशन विवीध अभियान राबवित आहे. त्यातील एक भाग म्हणजे ग्रामसमृद्धी अभियान. या अभियानातून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे कार्य अगदी विनामूल्य केले जाते व आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

You cannot copy content of this page