सामाजिक बांधिलकीच्या टीमने सुपूर्द केले नातेवाईकांकडे
सावंतवाडी : गुरुवारी दुपारपासून मिलाग्रीन फर्नांडिस (४२) ही महिला बेपत्ता झाली होती. आज दुसऱ्या दिवशी सकाळी ती आकेरी हुमरस येथील खान मोहल्ला जवळ कुडाळच्या दिशेला जाताना सामाजिक बांधिलकीच्या आपत्कालीन टीमला सापडली.
या टीमने तिला नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द केले आहे. यामुळे नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला आहे.
