कोकण मराठी साहित्य परिषदेचा कार्यक्रम;१० डिसेंबर रोजी आयोजन
⚡सावंतवाडी ता.०२-: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यांच्यावतीने संस्थानकालीन सावंतवाडी शहरातील जुन्या आठवणी जागवा आणि व्यक्त व्हा हा उपक्रम शनिवारी १० डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीराम वाचन मंदिर समोरील मोती तलावाच्या सेल्फी पॉइंट कट्ट्यावर होणार आहे. अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष अँड. संतोष सावंत व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.
संस्थानकालीन पूर्वीची सावंतवाडी आणि सावंतवाडी शहरातील अनेक आठवणी जुन्या जाणत्या व्यक्तीने पाहिल्या आहेत अनुभवले आहेत आता बदलती सावंतवाडी आणि या बदलत्या सावंतवाडीतील जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या दृष्टीने सावंतवाडी शहरातील जुन्या आठवणी जागवा आणि व्यक्त व्हा हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
सेल्फी पॉईंट येथील कट्ट्यावर सावंतवाडी काठावरची सायंकाळ अनुभवता यावी यासाठी सावंतवाडी शहराच्या जुन्या आठवणी जागवल्या जाणार आहेत नाविन्यपूर्ण असा हा उपक्रम असून ज्यांनी सावंतवाडीतील जुन्या आठवणी प्रसंग व अनुभवलेले क्षण असतील त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे व आपली नावे येत्या आठ डिसेंबर पर्यंत सहसचिव राजू तावडे व सचिव प्रतिभा चव्हाण यांच्याकडे नोंदवावीत जुन्या आठवणी व्यक्त होण्यासाठी काही ज्येष्ठ नागरिकांनी व साहित्यिकांनी आपली नावे नोंदवली आहेत. पाच मिनिटात सावंतवाडी शहरातील जुन्या आठवणी अनुभव कथन करायचे आहेत जुन्या आठवणीं चा उजाळा या निमित्ताने होणार आहे कार्यक्रम नियोजनासाठी घेतलेल्या बैठकीत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर उपस्थित होते
यावेळी तालुका अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत सचिव प्रतिभा चव्हाण उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे सहसचिव राजू तावडे एडवोकेट नकुल पारसेकर प्रा रुपेश पाटील रवी जाधव आधी उपस्थित होते दहा डिसेंबरला सायंकाळी सहा ते आठ या वेळेत श्रीराम वाचन मंदिर जवळील सेल्फी पॉइंट कट्ट्यावर जुन्या आठवणी जागवा आणि व्यक्त व्हा हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे तरी मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी नागरिक व्यापारी विद्यार्थी विविध संस्था आदींनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
