Headlines

पेंडूर येथील जुगाई देवीच्या त्रैवार्षिक मांडास भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ

⚡मालवण ता.३०-:मालवण तालुक्यातील पेंडूर येथील श्री देव वेताळ मंदिरातील श्री देवी जुगाईच्या त्रैवार्षिक मांडास आज अपूर्व उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. दिनांक ११ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या मांड उत्सवास विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची लयलूट होणार असून दिनांक १ जानेवारी दुपारी तीन वाजल्यापासून ओटी भरण्याचा तर दिनांक ९ जानेवारी रोजी होणाऱ्या दीपोत्सवाचा भाविकांनी लाभ…

Read More

आचरा-बेळणे मार्गावर चिरा-खडी वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसुलची कारवाई

डंपरमालकांना महसूल प्रशासनाने बजावल्या नोटीसा ⚡मालवण ता.३०-: मालवण महसूल प्रशासनाने शुक्रवारी आचरा व बेळणे मार्गावर अनधिकृतपणे चिरा व खडी वाहतूक करणारे दोन डंपर पकडले. याप्रकरणी संबधित डंपरमालकांना महसूल प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत. आचरा तिठा येथे महसूल प्रशासनाने सकाळी साडे सात वाजता डंपरचालक संतोष जानू खरात याच्या ताब्यातील डंपर (एम. एच. ०७ सी. ५४१९) पकडला. या…

Read More

सुहासिनी तळवडेकर यांचे निधन

⚡मालवण ता.३०-: वायरी भूतनाथ येथील तेलीवाडी येथील सुहासिनी सुधाकर तळवडेकर (वय ६५) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सुदेश तळवडेकर यांच्या मातोश्री होत.

Read More

उघड्यावर शौच करणाऱ्या पर्यटकांवर मालवण नगरपालिकेची कारवाई

⚡मालवण ता.३०-: वर्षअखेरच्या निमित्ताने मालवण शहरात सध्या पर्यटकांचा मोठा ओघ सुरू असून काही पर्यटकांकडून शहरात अस्वच्छता करण्याचे प्रकारही घडत आहेत. या पार्श्वभूमीवर उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व शौच करणाऱ्या पर्यटकांना मालवण नगरपालिकेने दणका देत संबंधित पर्यटकांवर रु. ५ हजारची दंडात्मक कारवाई केली आहे. मालवण शहरात जळगाव येथून आलेल्या काही पर्यटकांकडून उघड्यावर कचरा टाकला गेला तसेच उघड्यावर…

Read More

बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीवर कारवाईसाठी शासन कडक धोरण अंमलात कधी आणणार?

आम. वैभव नाईक यांचा अधिवेशनात तारांकित प्रश्न ⚡मालवण ता.३०-: नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमाने पारंपारिक मच्छीमारांच्या प्रश्नावर आवाज उठविला. राज्य शासनाने साडेबारा वावच्या आत मध्ये पर्ससीन नेट मासेमारी करण्यास बंदी घातलेली असताना देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात अनधिकृतपणे बेकायदेशीर पर्ससीननेट…

Read More

सायबर क्राईमचे वाढते गुन्हे पाहता नागरिकांनी सतर्क रहायला हवे…

प्रतिज्ञा खोत ; जिल्हा पोलीस प्रमुखांच्या संकल्पनेतून मालवणात जनजागृती कार्यक्रम… ⚡मालवण ता.३०-: सध्याच्या डिजिटलच्या युगात सायबर क्राईमच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याने नागरिकांनी आपली फसवणूक होऊ नये यासाठी सतर्कता बाळगायला हवी. सोशल माध्यमांचा वापर करतानाही आपला डाटा चोरीस जाता नये याबाबतही सावध रहायला हवे असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांनी येथे केले.जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ…

Read More

जिल्हा पोलिस अधिक्षकांची विशाल परब यांनी घेतली भेट

विशाल सेवा फाउंडेशन तर्फे शाल श्रीफळ देऊन सौरभकुमार अग्रवाल यांचा केला सत्कार ⚡कुडाळ ता.३० -: भाजपचे युवा नेते,युवा उद्योजक, विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष तथा हिंद मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विशाल परब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची भेट घेतली.दरम्यान या भेटीत विशाल परब यांनी सौरभकुमार अग्रवाल यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन…

Read More

चोरी प्रकरणातील पाच युवकांना पोलिसांनी केली अटक

चोरी प्रकरणातील पाच युवकांना पोलिसांनी केली अटक ओरोस ता.३०-: सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत व कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी एकूण पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. एकूण पाच चोऱ्या केल्याचा ठपका या युवकांवर असून गेल्या चार महिन्यात गॅस कटर आणि एक्सा ब्लेड याचा वापर करून या चोऱ्या केल्या आहेत. न्यायालयाने त्यांना…

Read More

उपसरपंच निवडीत सुद्धा भाजप नंबर एक

ठाकरे शिवसेनेचे सुद्धा अनेक ठिकाणी उपसरपंच;शिंदे गटाला मात्र अपयश ⚡सावंतवाडी ता.३०-: तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये बहुतांश ग्रामपंचायत मध्ये भाजपचे उपसरपंच विराजमान झाले त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा भाजपच नंबर एकचा पक्ष राहिला आहे, शिंदे गटाच्या पदरी मात्र निराशाच पडली, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनेही यात बाजी मारली आहे. तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या गणितांत…

Read More

सावंतवाडीत उडाण महोत्सवाचे थाटात उद्घाटन

दिपकभाई मित्रमंडळ व रोटरी क्लब च्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती सावंतवाडी : इनरव्हील महोत्सवाच्या पर्वणीनंतर दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून ‘उडान महोत्सव २०२३ जल्लोष नववर्षाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खाद्य जत्रेच्या जल्लोषासह मनोरंजनाची मेजवानी या महोत्सवाच खास आकर्षण असून शुक्रवारी उपविभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक, दीपकभाई मित्रमंडळ व रोटरी क्लबच्या…

Read More
You cannot copy content of this page