उपसरपंच निवडीत सुद्धा भाजप नंबर एक

ठाकरे शिवसेनेचे सुद्धा अनेक ठिकाणी उपसरपंच;शिंदे गटाला मात्र अपयश

⚡सावंतवाडी ता.३०-: तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये बहुतांश ग्रामपंचायत मध्ये भाजपचे उपसरपंच विराजमान झाले त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा भाजपच नंबर एकचा पक्ष राहिला आहे, शिंदे गटाच्या पदरी मात्र निराशाच पडली, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनेही यात बाजी मारली आहे. तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या गणितांत भाजपने उपसरपंच पद काबीज करत विरोधकांना चपराक दिली.

सावंतवाडी तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाने बाजी मारली होती येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने सुद्धा आपला गड राखला होता तर राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यात खाते खोलले होते त्यामानाने मंत्री दीपक केसरकर असलेल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला दोन ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले होते एकूणच यानंतर आज तालुक्यात पार पडलेल्या उपसरपंच निवडणुकीमध्ये सुद्धा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पदरी निराशाच पडली आहे येथे काही ग्रामपंचायतीवर उपसरपंच निवडून आले आहे मात्र तालुकाप्रमुख बबन राणे यांनी 15 ग्रामपंचायती पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर उपसरपंच बसल्याचा दावा केला आहे. तर येथे पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली असून 37 ग्रामपंचायतीपेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर उपसरपंच निवडून आल्याचा दावा येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने 10  पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर उपसरपंच बसवल्याचा दावा तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केला. यामध्ये  नेमळे उपसरपंच पदी सखाराम राऊळ, कलंबिस्त सुरेश पास्ते, धाकोरा सोनू गवस, भोमवाडी मायकल फर्नांडिस, वेत्ये शितल खांबल, तिरोडा संदेश केरकर, पाडलोस राजू शेटकर, पारपोली संदेश गुरव, कोनशी नाना सावंत, सातार्डा उत्कर्षा पेडणेकर यांची निवड झाली. ओटवणे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संतोष कासकर यांची निवड करण्यात आली ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून सातोळी बावळाट उपसरपंचपदी स्वप्नील परब यांची निवड झाली असून आंबेगाव व नाणोस ग्रामपंचायतीवर आपले उपसरपंच बसल्याचा दावा तालुकाप्रमुख बबन राणे यांनी केला.
तर भाजपाचे उपसंपरच निवडून आलेल्यामध्ये बांदा जावेद  खतिब, गेळे विजय गवस, सांगेली संतोष नार्वेकर,चराठे अमित परब, माडखोल कृष्णा राऊळ, माजगाव संतोष येजरे,  केसरी फणसवडे संदीप पाटील, तांबोळी जगदीश सावंत, भालावल अर्जुन परब, सातोसे रुपेश साळगावकर, पडवे माजगाव प्रज्ञा देसाई, डेगवे मंगेश देसाई, शिरशिंगे सचिन धोंड, सोनुर्ली भरत गावकर, कुणकेरी भगवान सावंत,ओवळीये मनस्वी सावंत, आजगाव सुशील कामठेकर, मडुरा कृष्णा गावडे, सरमळे दिपांकर गावडे, कोनशी अर्जुन सावंत,रोणापाल कृष्णा परब, वाफोली दिनेश गवस, वेर्ले मोहन राऊळ, शेर्ले दीपक नाईक, तळवणे रामचंद्र गावडे, गुळदूवे अशोक धर्णे,किनळे सुशिला डिसोजा,
कारिवडे नितीन गावडे,कुडतरकर टेब अनिकेत म्हाडगुत, कास गजानन पंडित, कलंबिस्त सुरेश पास्ते, कवठणी सोनम कवठणकर यांचा समावेश आहे. तर न्हावेली संतोष नाईक, नाणोस अमिता नाणोसकर, तिरोड्यात राष्ट्रवादीटे संदेश केरकर विराजमान झाले.

You cannot copy content of this page