चोरी प्रकरणातील पाच युवकांना पोलिसांनी केली अटक

चोरी प्रकरणातील पाच युवकांना पोलिसांनी केली अटक

ओरोस ता.३०-:

सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत व कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी एकूण पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. एकूण पाच चोऱ्या केल्याचा ठपका या युवकांवर असून गेल्या चार महिन्यात गॅस कटर आणि एक्सा ब्लेड याचा वापर करून या चोऱ्या केल्या आहेत. न्यायालयाने त्यांना २ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे सर्व युवक सिंधुदुर्गनगरी परिसरातील स्थानिक असून यातील काही सदन घरातील असल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्याकडून एकूण दोन लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धीरज बाळकृष्ण चव्हाण वय-२९ रा. ओरोस बुद्रुक, सर्वेश महेंद्र राणे वय-२१ रा.ओरोस बुद्रुक, रोहन रमाकांत परब वय-२५ रा. ओरोस बुद्रुक या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अन्य एका चोरीच्या गुन्ह्यात सदानंद उर्फ विजय मधुकर गोसावी, वय 30 वर्ष, राहणार आदर्श नगर, ओरोस बुद्रुक, प्रशांत संजय सुर्वे, वय 24 वर्ष, रा. रानबांबुळी पालकरवाडी या दोघांना अटक करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page