विशाल सेवा फाउंडेशन तर्फे शाल श्रीफळ देऊन सौरभकुमार अग्रवाल यांचा केला सत्कार
⚡कुडाळ ता.३० -: भाजपचे युवा नेते,युवा उद्योजक, विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष तथा हिंद मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विशाल परब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची भेट घेतली.दरम्यान या भेटीत विशाल परब यांनी सौरभकुमार अग्रवाल यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचे स्वागत करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विशाल परब व सौरभकुमार अग्रवाल यांच्यात विविध विषयावर सुमारे अर्धा तास चर्चा झाली.
