उघड्यावर शौच करणाऱ्या पर्यटकांवर मालवण नगरपालिकेची कारवाई

⚡मालवण ता.३०-: वर्षअखेरच्या निमित्ताने मालवण शहरात सध्या पर्यटकांचा मोठा ओघ सुरू असून काही पर्यटकांकडून शहरात अस्वच्छता करण्याचे प्रकारही घडत आहेत. या पार्श्वभूमीवर उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व शौच करणाऱ्या पर्यटकांना मालवण नगरपालिकेने दणका देत संबंधित पर्यटकांवर रु. ५ हजारची दंडात्मक कारवाई केली आहे.

मालवण शहरात जळगाव येथून आलेल्या काही पर्यटकांकडून उघड्यावर कचरा टाकला गेला तसेच उघड्यावर शौच केले गेले. या कारणास्तव मालवण नगरपालिकेने त्यांच्यावर ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. त्यावेळी आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, आरोग्य लिपिक मंदार केळुसकर, मिथुन शिगले उपस्थित होते.

पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे पर्यटन शहर असून नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. अलीकडेच मालवण नगर परिषदेने दिल्ली येथे इंडियन स्वच्छता लीग मध्ये देश पातळीवर पुरस्कार मिळवला आहे. त्यामुळे मालवण शहराचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. मालवण नगरपरिषद स्वच्छतेसाठी दिवस रात्र मेहनत घेत असताना अशा प्रकारचे अस्वच्छतेचे प्रकार पर्यटकांकडून केले जात असल्याने मालवण नगरपरिषदेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला. पर्यटकांनी मौज मजा करताना निसर्ग संवर्धन व शहर स्वच्छतेचाही विचार करावा, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page