बाजारपेठ साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त १३ रोजी कार्यक्रम
सावंतवाडी : बाजारपेठ सावंतवाडी येथील श्री साईबाबा मंदिरात १३ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार १३ एप्रिल २०२३ रोजी श्री साईभक्त मंडळामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वा. साईंची पूजा अभिषेक व आरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद तर रात्री ८ वाजता मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘कृष्णपूजन’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे….
