⚡मालवण ता.०९-: महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल ते १ मे या कालावधीत समतापर्व साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने शासनातर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन यात्रा साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये समितीचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणा विरोधी कायदा २०१३ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजविण्यासाठी सहप्रयोग व्याख्यान देणार आहेत. शासनाच्या कायद्यानुसार पोस्टर प्रदर्शन, पुस्तक विक्री, अभाअनिस सभासद नोंदणी तसेच जादूटोणा कायद्याअंतर्गत प्रात्यक्षिके करून घेण्यासाठी एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील सामाजिक संस्था, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, समता दूत यांनी आपापल्या गावांमध्ये, वस्तीमध्ये, मंडळामध्ये व जवळपासच्या शाळांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करावे आणि बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन यात्रेत सामील व्हावे. माहिती साठी विजय चौकेकर- 9420974775, समीर साळकर- 7875165986, अनिल चव्हाण- 9767938161, संजय खोटलेकर-
9511240580, सुरेश पवार-
9422633118, रामा ठाकूर-
9420208374 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीचे जिल्हा सरचिटणीस विजय चौकेकर यांनी केले आहे.
