बांदा/प्रतिनिधी
सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ ट्रस्ट डोंगरपाल-डिंगणे येथे १२ ते १४ एप्रिल या कालावधीत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह भ प यांच्या उपस्थितीत कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत श्री गुरुचरित्रवाचन होणार आहे. त्यानंतर सर्व मठांचे संस्थापक अध्यक्ष वंदनीय महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होणार आहे. सायंकाळी ५ वाजता उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ होणार आहे. सायंकाळी ६ ते रात्री १०.३० या वेळेत कीर्तन तसेच भंडारा महाप्रसाद होणार आहे.
हा कीर्तन सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री सद्गुरू स्वामी समर्थ मठ माडखोल, डिंगणे, इळये सडा (देवगड), तुळस (वेंगुर्ला), डिगस (कुडाळ), कलंबिस्त, आंबोली, ठाणे, डोंबिवली, अलिबाग, वाणदे (मुरुड जंजिरा), झाराप, उपवडे, कल्याण मठ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत आहे. उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ डिंगणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
डोंगरपाल समर्थ सेवा मठात १२ ते १४ रोजी कीर्तन सोहळा
